Halad lagwad / हळद लागवड मध्ये महाराष्ट्र चा 4 क्रमांक
halad lagwad / हळद लागवड साठी महाराष्ट्रातील वातावरण अनुकूल आहे .

हळद लागवड हे एक मसाले वर्गातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र एक लाख 25 हजार हेक्टर असून उत्पादन क्षमता पाच लाख पन्नास हजार टन इतकी आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ 80 टक्के उत्पादन भारतामध्ये घेतले जाते.
परंतु त्यापैकी पंधरा ते वीस टक्के फक्त हळद निर्यात होते आणि उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश असून त्यानंतर ओडिसा ,तमिळनाडू ,आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो.
महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली आठ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 42500 मे टन होते.
भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हळदीची लागवड कोणीही करू शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे त्यासाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे.
त्यामध्ये सतत होणाऱ्या हळदीच्या दरामधील चढ-उतार उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र सेंद्रिय खतांची कमतरता मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, तांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याची प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या रोजच्या आहारातील हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे .
100 ग्रॅम हळदीमध्ये खालील घटक आढळतात :
पाणी ,ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके ,तंतू राग, कॅल्शियम, फॉस्फरस ,पोटॅशियम ,सोडियम ,लोह, जीवनसत्व, नियासीन ,एस्कॉरिक ऍसिड ,कुरकुम इन आणि शुद्ध सुगंधी तेल.
हळदीचे औषधी गुणधर्म :
आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोट दुखी निवारण, रक्त शुद्धीकरण, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्त हरक आणि भूक बुद्धिपित करणारे आहे.
हळदीमुळे तो तिचा रंग उजळतो तसेच ती रक्त शुद्धीसाठी गुणकारी आहे.
पायावर सूज आल्यास हळद गूळ व गोमूत्र गरम करून प्यावे.
डोळ्यांचे विकारांवर हळकुंड तुमच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.
डाळींच्या पिठामध्ये थोडी हळद थोडा बिसलेला कापूर व चार ते पाच थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग किंवा खास थांबून पूर्ण सुधारले.
धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य ,पूजा ,भंडारा ,सौंदर्यप्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करता येतात.
हळद लागवड हवामान :
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही वेळेस सहज सहन करू शकते परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक ठरते.
तसेच जास्त हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी 500 ते 750 मिलिमीटर असणाऱ्या निमशः वातावरणात हळदीचे पीक चांगले येते. थंडीमुळे हळदीची पाने वाढ काही अंश थांबते व जमिनीतील कंदाची वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.
हळद लागवड साठी जमीन कशी असावी :
हळद पिकाची यशस्वी किंबहुना फायदेशीर लागवड हे प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून असते. हॅपी विविध प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरीसुद्धा त्या जमिनीचे भौतिक रासायनिक तसेच जैविक गुणधर्म जमिनीची जडणघडण जमिनीचा सामू आणि जमिनीचा उतारा या गोष्टी लागवडीपूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीचा प्रकार तिचे विविध गुणधर्म त्या जमिनीचा पोत याचा अभ्यास करून हळद लागवड करावयाची की नाही हे ठरवावे लागते. या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये.
चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. आपल्याकडे हलक्या व मांजरांच्या जमिनी सुद्धा हळदीची पीक घेता येईल मात्र सरासरी उत्पादन मिळवण्यासाठी त्या जमिनीची सुपीकता वाढवणे गरजेचे आहे.
हळद लागवड साठी सुधारित जाती :
1) फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाडीची सवय असून पाण्याचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या सहा ते सात असते या जातीचा पक्वतेचा काळ हा 8.5 महिन्याचा असून फुटव्याची संख्या दोन ते तीन प्रति झाड असते. या जातीचे जेडे गडे मध्यम आकाराचे असून वजनाचे 50 ते 55 g असतात.
हळकुंडे 35 ते 40 ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात सात ते आठ हळकुंडे असतात त्यानंतर त्यावर उप हळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी सात ते आठ सेंटीमीटर असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण एकास पाच असे आहे. हळकुंडाच्या गाब्याचं रंग गर्द पिवळसर असा आहे या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारित असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे 5.19 टक्के इतके असून अवतार 22 टक्के इतका मिळतो.
या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन 358 क्विंटल पर हेक्टर दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन 90 क्विंटल पर हेक्टर दिल्याची नोंद झालेली आहे. या जातीमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.
2) सेलम : या जातीची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये 12 ते 15 पाने येतात आणि झाडा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 12 ते 15 पाने येतात. हळकुंडे व उप हळकुंडे असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो.
हळकुंडावरील पेऱ्यांची संख्या ठ ते नऊ असते त्याच्या हळदीचे उत्पादन 350 ते 400 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुर्कुमींचे प्रमाण 4.5 टक्के असते. वाळलेल्या हळदीचे 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास 8.5 ते नऊ महिने लागतात.
चांगल्या कसदार पोत्याच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ पाच फुटापर्यंत वाढते आणि तीन ते चार फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली ,सातारा ,कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी या जातीची शिफारस केली आहे.
3) कृष्णा : या जातीची हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्यायामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेढ्यांची संख्या आठ ते नऊ असून झाडांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकूण पिकाच्या कालावधीमध्ये दहा ते बारा पाने येतात.
वाढलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात आणि वाळल्यानंतर मुख्य हळकुंडांची लांबी जवळजवळ सहा ते सात सेंटीमीटर असते. या जातीच्या वाढलेल्या हळदीचे उत्पादन 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टरी येते.
4) राजापुरी : या जातीची पाने रुंद फिकट हिरवी व सपाट असतात. पिकांच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये दहा ते अठरा पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहल कुंडे असतात.
हळकुंडाची साल पातळ असून रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा अठरा ते वीस टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन 55 ते 58 क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास आठ ते नऊ महिने लागतात.
या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यातून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बऱ्याच वेळा हळदीच्या बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो म्हणून ही जात कमी उत्पादन देणारी असली तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.
5) खाण्याची हळद : ही बहुवर्षीय जात असून 60 ते 90 सेंटीमीटर उंच वाढते पाण्याचा खमंग वास असून फळे तीन धारी असतात. बोंड कंद आखूड व जाड असतो.
पातळ पाणी साठ ते नव्वद सेंटीमीटर लांब असून कंदापासून सहा ते दहा पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळी सर पांढरी असतात मात्र लागवडीच्या पिकात फळे धारण नाही कारण ती नपुंसक असतात आणि या जातीची 96 टक्के लागवड भारतात होते.
6) कस्तुरी हळद किंवा रान हळद : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात, कंद मोठे ,गोलाकार ,फिकट पिवळे असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या हळकुंडास गोड वास असतो
आणि सहा पॉईंट एक टक्के हिरवट तपकिरी तेल कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाणी लांब वर्तुळाकार व आल्यासारखी टोकदार आणि मध्य शिरा उठावदार असतात.
7) आंबेहळद : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबेहळत असे म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात.
बहुवर्षीय जात असून पाणी लांब वर्तुळाकार आल्यासारखी व पानाचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शिर उठावदार असते फुले हिरवट पांढरी असून , बोंड तीनदारी असते.
8) काळी हळद : बंगालमध्ये आढळते. ताजे, कंद ,फिकट, पिवळे सुवासिक सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये 9.76% सुशिक्षित तेल असते.
9) कचोर : वार्षिक जात असून कोकणात सर्वात या जातीची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानाचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.
हळद लागवड पूर्व मशागत कशी करावी :
हळद लागवडीमध्ये पूर्व मशागतीच्या कामांमध्ये नागरत करणे ढेकळे फोडणे शेताच्या काड्या कुदळीने किंवा टिकवणे खाणून हे सर्व कामे पुरवनियोजन करून त्याचप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी जमिनीच्या ट्रॅक्टरने 18 ते 22 सेंटीमीटर पर्यंत खोल नागरिक करून घ्यावी.

हळद लागवडीच्या पद्धती :
1) सरी वरंबा पद्धत : हळदीचे कंद जमीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंदवरंबा पद्धतीने करावयाची झाल्यास 75 ते 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढून घ्याव्यात.
शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमिनीच्या उताराप्रमाणे सहा ते सात सरी वरंबाचे एक वाकुरे याप्रमाणे वाकोरी बांधून घ्यावे.
वाकुरांची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल तशी ठेवावी सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याची पाठ सोडावीत.
2) रुंद वरंबा पद्धत : रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते या पद्धतीची लागवड केल्यास गड्डे चांगले पुसून उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास जमीन सम पातळीत असणे आवश्यक आहे
किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सेंटीमीटर अंतरावर प्रथम सरा पाडाव्यात त्या सऱ्या उजळून 80 ते 90 सेंटीमीटर माता असलेले 15 सेंटीमीटर उंचीचे
व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रुंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याच्या माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.
हळद लागवड साठी बेणे :
एकरी एक हजार किलो बेणे लागते. लागवड मातृ कंदापासून करतात या कंदापासून तयार केलेल्या 30 दिवसाच्या वयाच्या रोपांपासूनही लागवड करतात. कन्या कंधही लागवडीसाठी वापरतात.
हळद लागवड साठीची बीज प्रक्रिया :
एक लिटर जर्मिनेटर 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये शंभर किलो बेणे दहा मिनिट भिजवून नंतर ते सुकवून लावावे. हे द्रावण दोन ते तीन वेळा वापरता येत त्यामुळे कंद लवकर एकसारखे उगवून मर होत नाही.
हळद लागवड पाणी व्यवस्थापन :
हळदीची लागवड एप्रिल मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते कारण दरम्यानच्या काळात मुलांकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्त्वाचा कालावधी असतो. म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच चार ते सहा दिवसाच्या अंतराने द्यावे.
जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी जास्त ठेवावा. पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठवून ठेवणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळी मधील अंतर बारा ते पंधरा दिवस ठेवावे मात्र पीक काढणीच्या पंधरा दिवसा अगोदर अजिबात पाणी देऊ नये.
हळद लागवड खत व्यवस्थापन : सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते,
त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
कीड नियंत्रण :
कंदमाशी ,
पानातील रस शोषून घेणारा ढेकूण,
पाने गुंडाळणारी अळी
या या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
हळद लागवड हंगाम उपायोजना :
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर बाष्पाची गरज भागवण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा यालाच डस्ट मल्चिंग असे म्हणतात.
पिकातील काढलेले तर दोन ओळीत पसरून ठेवावे. द वर्णी करताना दौऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरली जाईल त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो.
हळद लागवड आंतरमशागत ::
झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो. पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते
.जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
हळद शिजवून वाळवणे व पॉलिश करणे :
हळद शिजवताना सचित्र वापर करून हळद शिजवणे फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये डिझेलच्या बॅरेल पासून बनविलेले एक पॉईंट पाच फूट उंचीचे व दोन फूट व्यासाचे चार ते पाच सचिद्र ड्रम पाच फूट व्यासाच्या मोठ्या कडे मध्ये पाणी ओतून पाण्याची आतील पातळी ड्रमच्या उंचीच्या वर चार ते पाच सेंटीमीटर इतकी ठेवली जाते. नंतर ड्रम जाड गोल पाटाने झाकून घेतले जातात.
या पद्धतीने हळद फक्त 25 ते 30 मिनिटात चांगल्या प्रकारे शिस्ते त्यावेळी पाण्याचे तापमान 90 डिग्री ते शंभर डिग्री सेंटीग्रेड असते. हळद शिजल्यानंतर चुलवानामध्ये इंधन टाकल्याने प्रमाण कमी केले जाते त्यामुळे आपोआप पाण्याची तापमान कमी होते शिजलेल्या हळदीचे ड्रम लांब बांबूच्या साह्याने दोन कड्यांमध्ये असून दोन व्यक्तीकडून वाढविण्यासाठी खळ्यामध्ये अथवा कठीण जागेवर टाकावे.
असे रिकामी झालेले ड्रम पुन्हा कच्चा हळदीने भरून काही गरम पाण्यात ठेवावे.
पाण्याची पातळी पुन्हा ठेवलेल्या ड्रम वर चार ते पाच सेंटीमीटर राहिले इतकी ठेवली जाते. ठेवलेले ड्रम वरील प्रमाणे गुण पाठात जगतात व परत इंधन झाकून त्याच पद्धतीने हळद शिजवली जाते.
हळद वाळविणे : हळद शिजवल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच दिवस तीन ते चार इंचापेक्षा मोठा थर देऊ नये. मोठा थर दिल्यास हळकुंड व्हायला उशीर लागतो त्याचप्रमाणे हळकुंड काळी पडतात आणि हळकुंडे साधारणपणे आठ ते दहा दिवस उन्हात चांगली वाढवावी आणि वाढलेली हळद पाण्याने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. हळद शक्यतो तोड पत्री वरती किंवा कठीण जागेवरती वाळवावी त्यामुळे मजुरी वरती होणारा खर्च कमी होईल.
पॉलिश करणे :
वाळलेली हळद विक्रीसाठी मार्केटला पाठवण्यापूर्वी पॉलिश करणे अत्यंत आवश्यक असते. हळद पॉलिश करणे म्हणजे वाळलेल्या हळकुंडावरची खरबरीत साल काढून टाकणं होय . पोलीस करण्यासाठी ऑइलच्या बॅरलला एक पॉईंट दोन ते दोन इंच अंतरावरती शनिने भोक पाडून त्या बॅरल लोखंडी कन्यावरती फिट करून हा पोलीस ड्रोन स्टैंड वर बसून फिरवल्यास हळकुंडाची वरची साल निघून जाते व हळद पॉलिश होते.
हेच काम एक एचपी सिंगल फेज मोटर वरती चालणाऱ्या लाकडी अष्टकोनी ड्रम वरतीच करता येते. हळद पोलीस केल्यानंतर प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी मोठे हळकुंड मध्यम लहान कणी त्याचप्रमाणे गड्डे स्वरा गड्डा अशी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रतवारी करून तयार करून विक्रीसाठी मार्केटला पाठवावा.
हळद लागवड उत्पादन :
हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात निरोगी बियाणे, दिलेली खते, जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते.
सर्वसाधारणपणे ओल्या हळदीचे प्रती हेक्टरी 250 ते 350 क्विंटल इतके उत्पादन मिळते. तसेच या ओल्या हळदीपासून 58 ते 75 क्विंटल वाळलेली हळद मिळते.

FAQ :::
1) हळद लागवड शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = हळद चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) हळद हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = हळद पीक हे 1 वर्षीय आहे.
click here for video ; https://youtu.be/F3MK1Q2OiRc?si=GWg-X6RCu9n-iWtl