गवार लागवड ( Gavar lagwad ) खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते
गवार मध्ये जीवनसत्व अ, ब ,क बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असते.

गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगांची भाजी साठी उपयोग केला जातो आणि तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पीक असून महाराष्ट्रामध्ये अंदाजे 9000 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड केली जाते. गुजरात ,राजस्थान ,उत्तर प्रदेश हे जनावरांसाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून गवारचा ही उपयोग करतात.
गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. गवारीच्या शेंगांमध्ये फॉस्फरस ,चुना, लोह इत्यादी खनिजे आणि जीवनसत्व अ, ब ,क बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असते. गवारीच्या डिंकांचा कागद, कापड, सौंदर्यप्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला जातो.
हवामान आणि जमीन :
गवार हे उष्ण हवामानातील पीक असून सरासरी 18 ते 30 अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक उत्तम रित्या येऊ शकते. खरिपातील उष्ण व दमट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही आणि हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. उत्तम पाण्याचा चांगला निसरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते आणि त्यासोबत जमिनीचा पीएच ७.५ ते आठच्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.
लागवड हंगाम :
गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात गवारीची लागवड जानेवारी ,फेब्रुवारी या महिन्यांमध्ये करतात.
बियाण्याचे प्रमाण हेक्टरी 14 ते 24 किलो लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्वी दहा ते पंधरा किलो बियाणात 250 ग्रॅम रायझोबियम चोळावे.
पूर्व मशागत :
जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सेंटिमीटर ठेवावे आणि झाडातील अंतर 20 ते 30 सेंटीमीटर ठेवावे.
काही शेतकरी पंचेचाळीस सेंटीमीटर पावरणे बी पेरून नंतर यंत्राने सरी पाडून 45 ते 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूंनी दोन झाडातील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवून बिया टोचतात.
खते व पाणी व्यवस्थापन :
गवार हे शेंग वर्गातील कोरडवाहू पीक म्हणून घेतल्यास त्यास खताची फारशी गरज भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 60 किलो पलास द्यावे.
जमिनीच्या आवश्यकतेनुसार विकास पाणी द्यावे व पिकाला पाणी माफक प्रमाणात लागते परंतु फुले आल्यापासून शेंगांचा बहार पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे.

आंतर मशागत :
पेरणीनंतर दहा ते वीस दिवसांनी रोपांची विरळणी करून जोमदार व उत्तम वाढीतील अशा अंतराने रोपी ठेवावेत आणि तीन आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावेत. दुसरी खुरपणी तणांचे प्रमाण पाहून करावे.
वाण :
पुसा सदाबहार : ही सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केली जाते या जातीच्या शेंगा 12 ते 15 सेंटीमीटर लांब असून शेंगा हिरव्या कोवळ्या व बिन रेषांच्या असतात. शेंगांची काढणे 45 ते 55 दिवसांनी सुरू होते.
पुसा नाव बहार : ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगली उत्पादन देते. शेंगा पंधरा सेंटीमीटर लांब कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात. झाडांची सरळ वाढ होते आणि पानाच्या बोचक्यात शेंगांचा घोस असतो.
पुसा मोसमी : ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीच्या शेंगा दहा ते बारा सेंटीमीटर लांब असून ही जात 75 ते 80 दिवसात काढणी सुरू होते. शेंगा आकर्षक चमकदार, हिरव्या रंगाच्या असतात. या जातीत फांद्या अधिक प्रमाणात फुटून मुख्य खोड आणि फांद्यांच्या टोकावर शेंगा येतात.
शरद बहार : या जातीचे झाड उंच असून झाडाला दहा ते चौदा फांद्या असतात. शेंगा आकर्षक मऊ रसरशीत लांब असतात. ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे.
कीड व रोग :
भूरी : भुरी हा बुरशीजन्य रोग असून पानाच्या दोन्ही बाजूंवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो.
उपाय : 50% ताम्रयुक्त औषध कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम हे दहा लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्या.
मर : मर हा बुरशीजन्य रोग असून या रोगांची लागण झालेले झाड कोण म्हणून जाते आणि प्रथमतः ते पडते व बुंध्याजवळ अशक्त बनते.
उपाय : बियाणास प्रति किलो चार ग्रॅम थायरम चोळावे. रोबोट झाडाभोवती बांगडी पद्धतीने ताम्रयुक्त औषधाचे द्रावण आठ ते दहा सेंटिमीटर खोल माती भिजल असे होतावे.
कीड : या पिकावर मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. उपाय म्हणून किडींच्या नियंत्रणासाठी पिकांवर डायमेथोएट 30 हे १.५ मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उत्पादन :
भाजीसाठी हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यात रेषांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकर शिजत नाहीत. शेंगांची तोडणी तीन ते चार दिवसातून करावे णि सर्वसाधारणपणे हिरव्या शेंगांचे हेक्टरी 100 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते.
click for video : https://youtu.be/wb34M4b0yvI?si=ZHfP8u2IZK8sXJpT