castor crop ( एरंडी पीक ) लागवड . होऊ शकता FAIL कारण ? 3

एरंडी शेती लागवड / एरंडी पीक पेरणी  ( Castor crop ) आणि 10 लाखों रुपयांचा नफा.

castor crop ( एरंडी पीक ) हे मेडिसिन बनवण्यासाठी वापरले जाते.

castor crop

एरंडी शेती ( castor crop ) करून कमी खर्चात जास्त लाखो रुपये कमवा .एरंडी शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही भारता मध्ये खूप असे शेतकरी आहेत की जे औषधिय पिकांची शेती करत आहेत ,

त्यातील एक पीक म्हणजे एरंडी ( Castor crop ) हे पण आहे ,कोणत्याही प्रकारच्या मती मध्ये येणारे पीक म्हणजे एरंडी.
खालील काही राज्यामध्ये एरंडी शेती ( Castor crop ) जास्त प्रमाणात दिसून येते :
  बिहार
पश्चिम बंगाल
हरियाणा
गुजरात
हिमाचल प्रदेश
उत्तरप्रदेश
उत्तराखंड
झारखंड.
या पिकामध्ये शेतकरी लोकांना जास्त नफा मिळतो,

कारण एरंडी च्या तेलाची ( Castor oil ) मार्केट मध्ये खूप जास्त मागणी आहे , demand आहे.आणि या एरंडी तेलाचा medicine बनवण्यासाठी उपयोग केला जातो.म्हणून एरंडी ला एक संजीवनी बुटी म्हणून संबोधले जाते.
एरंडी च्या शेती साठी सरकार कडून शासकीय subsidy पण दिली जाते. की जेणे करून शेतकरी एरंडी शेती ( Castor crop ) कडे जास्त वळतील.

एरंडी पीक लागवड करण्यापूर्वी :

एरंडी पीक ( castor crop ) साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे एरंडी.
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये एरंडी पिकाची लागवड करू शकतात.


एरंडी शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते असे नाही, कमी पाण्यात पण एरंडी लागवड successful ठरते.
लागवडीची वेळ : जुलै ते सप्टेंबर मध्ये
पहिली पीक काढणी : नोव्हेंबर
दुसरी पीक काढणी. : फेब्रुवारी
तिसरी पीक काढणी : एप्रिल


माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर एरंडी लागवड करण्यासाठी 15 ते 20 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 120 ते 150 दिवसामध्ये एरंडी ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
एरंडी चे रोप तयार करणे :
एरंडी ची लागवड शेतकरी दोन प्रकारे करू शकतात , एक म्हणजे नर्सरी मध्ये रोप तयार करून नंतर शेतात लागवड करायची किंवा Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची

एरंडी पीक लागवड ( Castor farming) साठी जमीन कशी असावी :

एरंडी शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.एरंडी ( Castor ) साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,

त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की एरंडी लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . एरंडी च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.

एरंडी लागवड कधी करावी :

एरंडी ( Castor farming) ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . लागवड ही दोन प्रकारे करतात एकदा रोप तयार करून आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
  लागवडीची वेळ : जुलै ते सप्टेंबर मध्ये
पहिली पीक काढणी : नोव्हेंबर
दुसरी पीक काढणी. : फेब्रुवारी
तिसरी पीक काढणी : एप्रिल
एरंडी ची सुरुवात ही पाऊस पडल्यानंतर जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून तीन वेळेस पीक काढणी करता येते.

एरंडी पूर्व मशागत कशी करावी .

एरंडी ची बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण एरंडी ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे एरंडी ल जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 3 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे एरंडी बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.


दुसरी पद्धत म्हणजे एरंडी बियाणे शेतात directly न लावता कमी जागे मध्ये त्यांची रोपे तयार करून घ्यावे .रोप तयार करताना medium level पाणी वापरावे, त्यामुळे रोप जळत नाही.रोप तयार झाल्यावर 15 ते 20 दिवसांनी ते रोप शेतात पेरणी / लागवड करायला तयार झालेले असतात. अश्या दोन पद्धतीनें आपण शेतकरी एरंडी लागवड ( Castor farming) करू शकतो.

एरंडी च्या सुधारित जाती :: एरंडी हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे.
GNCH 1 hybrid castor seed
GCH 10 Hybrid castor seed
GCH 8 hybrid castor seed
GCH 9 hybrid castor seed
GCH 7 hybrid castor seed
GCH 2 hybrid castor seed


Navbharat hybrid castor seed
Mahadeva hybrid castor seed
Mahashiva hybrid castor seed
Mahavira hybrid castor seed
Big boss hybrid castor seed
Maharana hybrid castor seed
Green star hybrid castor seed


Shree ji organic castor seed
Goldi hybrid castor seed
PMW castor seed
Lagrifarm castor seed
Shiva hybrid castor seed
Rajmoti rch castor seed
GCH 4 castor seed

एरंडी बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर एरंडी लागवड करण्यासाठी 15 ते 20 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 120 ते 150 दिवसामध्ये एरंडी ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.


परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर एरंडी ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते.
जर एरंडी ही सोयाबीन सोबत पीक घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये आपल्याला हेक्टरी 3 ते 4 कीलोग्रम एरंडी बियांमध्ये लागवड करू शकतो.
आणि तेच जर आपण एरंडी स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .


अनुभवी शेतकरी एरंडी चे पीक आंतरपीक म्हणूनच घेतात .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

एरंडी पेरणी पद्धत :

एरंडी पेरणी करावी किंवा एरंडी ची लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो एरंडी ची पेरणी केल्यावर एरंडी च्या झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .पण त्यापेक्षा एरंडी आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 3 ते 4 फूट अंतरावर एरंडी ची लावणी झाली पाहिजे .

जास्त अंतरावर एरंडी लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे एरंडी पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
नंतर त्या बेड वर 3 फूट अंतरावर एरंडी seed लावावे .


नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.

एरंडी ची पेरणी अंतर आणि खोली::

एरंडी पीक लागवड करताना 3 ते 4 फूट अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.


लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.

एरंडी पिकातील आंतरपिके ::

खालीलप्रमाणे आपण एरंडी पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
सोयाबीन
हरबरा
उडीद
मुंग
तूर
काकडी


टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग

एरंडी आंतरमशागत ::

एरंडी लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे एरंडी पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .

जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही एरंडी मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व एरंडी लागवड करू शकतो.

एरंडी शेती ( castor farming) पाणी व्यवस्थापन::

एरंडी शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण एरंडी पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी एरंडी साठी हानिकारक ठरते .

जास्त पाणी दिल्यास एरंडी चे झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी एरंडी ला देऊ नये.
एरंडी ही कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ शेती मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.

खते कोणती वापरावी :

सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .

माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर एरंडी शेती साठी करावा.

कीड :
एरंडी शेती लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या एरंडी च्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे काळी अंगावर केस असलेली अळी.

ही काळी अळी झाडाची पाने खाते व त्यामुळे झाडाची वाढ थांबते. म्हणून लवकरात लवकर अळी च नियोजन करावं म्हणजे कीटकनाशक फवारणी करावी.

कीटकनाशके कोणती वापरावी :

खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके काळी आली किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) कात्यायनी tripple attack insecticide
2) plantic organic 3 in 1

काढणी आणि मळणी :

एरंडी लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 3 महिन्यानंतर पीक काढणी करायला येतात . 3 महिन्याच्या अंतराने  एरंडी 3 वेळेस काढणी साठी येते.


त्यानंतर सर्व पीक जमा करून कडक उन्हात वाळू घालावे.त्यानंतर यंत्राच्या साह्याने पीक तयार करून घ्यावे , आणि पोथ्या मधून जमा करून साठवून ठेवावे.

उत्पादन  : एरंडी चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 35 ते 40 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर  12 ते 14 क्विंटल होऊ शकते

बाजार भाव :
2023 मध्ये 4800 रुपये प्रति क्विंट
2024 मध्ये 5600 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 6000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

उद्योग :

एरंडी पासून एरंडी चे तेल काढून त्याचा वापर medical साठी उपयोग करता येतो.
या एरंडी तेलाचे विदेशा मध्ये खूप डिमांड आहे .म्हणून ते भारतातून export केले जाते. बाहेर देशामध्ये खूप जास्त बाजार भाव मिळतो.


जपान आणि चीन सारख्या अजून काही देशामध्ये सुद्या एरंडी पीक लागवड ( Castor  farming) काही प्रमाणात केली जाते.म्हणून Castor oil साठी भारत देशातून पुरवठा केला जातो.
Castor oil चा उपयोग  Cosmetic बनवण्यासाठी केला जातो.
पोटदुखी साठी उपाय म्हणून वापरतात


साबण तयार करणे , मालिश तेल तयार करण्यासाठी पण तेलाचा वापर केला जातो
शुण्यापेक्षा कमी तापमानात पण एरंडी तेल freeze होत नाही म्हणून त्याला संशोधन करण्यासाठी पण वापरतात

एरंडी पीक videos https://youtu.be/crNDcTilm-g?si=3QsHpBYio6p9uri8

FAQ ;;

1) एरंडी शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर =  एरंडी चे झाडे आणि त्यातील तेल हे मातीसाठी पोषक असते . एरंडीचे झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.

2) एरंडी शेतीचे फायदे काय आहेत ?
उत्तर = एरंडीचे तेल साबण, नायलॉन ,रसायने, हायड्रॉलिक ब्रेक , वंगण , पेंट्स आणि बायोडिझेल तयार करण्यासाठी वापरतात.

3) एरंडीचे तेल सुरक्षित आहे का ?
उत्तर = होऊ , एरंडीचे तेल अंगाला लावण्यासाठी सुरक्षित आहे , परंतु एरंडी ची तेल पिऊ नये त्यामुळे पोटाचे समस्या होऊ शकतात.

मुंग लागवड ;

https://amchisheti.com/mung-bean-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-50-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/