bhendi lagwad / भेंडी लागवड 12 ही महीने करता येते .
bhendi lagwad / भेंडी लागवड साठी परभणी क्रांती हा वाण योग्य .

भेंडी हे उत्तम फळभाजी पीक आहे आणि भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडीन ही मूलद्रव्य आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. महाराष्ट्रामध्ये भेंडी खाली सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. भेंडी हे पीक वर्षभर घेतले जाणारे पीक आहे.
भेंडी लागवड साठी जमीन कशी असावी:
भेंडी पिकाची यशस्वी किंबहुना फायदेशीर लागवड हे प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून असते. भेंडी विविध प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरीसुद्धा त्या जमिनीचे भौतिक रासायनिक तसेच जैविक गुणधर्म जमिनीची जडणघडण जमिनीचा सामू आणि जमिनीचा उतारा या गोष्टी लागवडीपूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीचा प्रकार तिचे विविध गुणधर्म त्या जमिनीचा पोत याचा अभ्यास करून भेंडी लागवड करावयाची की नाही हे ठरवावे लागते.
या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी आणि क्षारयुक्त जमिनीतभेंडी चे पीक चांगले येत नाही म्हणून भेंडी लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये. चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
आपल्याकडे हलक्या व मांजरांच्या जमिनी सुद्धा भेंडी पीक घेता येईल मात्र सरासरी उत्पादन मिळवण्यासाठी त्या जमिनीची सुपीकता वाढवणे गरजेचे आहे.
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .
दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे , त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते .
भेंडीची पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पीक घेतले जाते. या पिकासाठी 20 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळ्यात भाज्यांची अडचण असताना भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
हे उष्ण हवामानातील पीक असून सरासरी 18 ते 30 अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक उत्तम रित्या येऊ शकते. खरिपातील उष्ण व दमट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही आणि हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. उत्तम पाण्याचा चांगला निसरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते आणि त्यासोबत जमिनीचा पीएच ७.५ ते आठच्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.
भेंडी लागवडीसाठी वान :
पुसा सावली
फुले उत्कर्ष
परभणी क्रांती
अर्का अनामिका
या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत.
भेंडी लागवड बियाण्याचे प्रमाण :
खरीप हंगामात हेक्टरी आठ किलो आणि उन्हाळ्यात दहा किलो बियाणे पुरेसे होते. एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम चोळावे.अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 8 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 2 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
भेंडी लागवडीचा हंगाम :
भेंडी लागवड तीनही हंगामात करता येते. खरीप बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगाम बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावतात. उन्हाळी हंगाम बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फिरून रोपांची लागवड फेब्रुवारीमध्ये करावी.
भेंडी लागवड पूर्व मशागत व लागवड :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे. बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.
बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते
जमिनीची मशागत एक नागर व दोन कुळवण्या करून भुसभुशीत करून घ्यावी व हेक्टरी 50 गाड्या शेणखत मिसळून तिसरी कुळवणी करावी. पेरणीसाठी खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर ठेवावे आणि उन्हाळ्यात 45 सेंटीमीटर ठेवा. एका ओळीतील दोन झाडात 30 सेंटीमीटर अंतर राहील अशा बेताने बी टाकावे
आणि प्रत्येक ठिकाणी दोन बियाणे टाकावे. उन्हाळ्यात सऱ्या पाडून वरंबाच्या पोटाशी बी टाकावे शेतात उलवणी करून वाफ्यावर आल्यानंतर मी पेरावे.मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नागरून आणि कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. गुळव्याध च्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखत जमिनीत पसरून मिसळून द्यावे.
भेंडी लागवड साठी खते व पाणी व्यवस्थापन :
पेरणीच्या वेळी पन्नास-पन्नास किलो नत्र स्फुरद व पलाश यांची मात्रा जमिनीत मिसळून द्यावी व पेरणीनंतर एका महिन्याने कालावधीने नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो या प्रमाणात द्यावा. तेरे नंतर इतके हलके पाणी द्यावे की जास्त पाणी व्हायला नको. त्यानंतर पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या.पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे.
त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.
रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.
शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. वांगी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुहा आणि पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथिंबीर घेता येतात.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .
माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
भेंडी लागवड आंतर मशागत : झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी.
दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो.
पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
रोग व कीड :
भुरी : भेंडीवर प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
उपाय: या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक एक किलो किंवा डायथेन एम एस 45 आणि 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीड : भेंडी विकास मावा किंवा तुडतुडे किंवा शेंडे अळी किंवा लाल अळी या किडींचा प्रादुर्भाव होत असतो.
या किडींच्या नियंत्रणासाठी 35 मीमी इंडोसल्फान हे 500 लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारावे. पहिली फवारणी उगवणीनंतर पंधरा दिवसांनी नंतरच्या फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.

भेंडी लागवड काढणी व उत्पादन :
पेरणीनंतर 55 ते 60 दिवसाची फळे तोडणीस तयार होतात. दर तीन ते चार दिवसांनी फळे काढणीला येतात. परभणी क्रांती हा वाण केवढा रोगास बळी पडत नसल्याने इतर वनापेक्षा तीन ते चार आठवडे अधिक काळ पर्यंत फळाची तोडणी करता येते.
खरीप हंगामात हिरव्या फळाचे उत्पादन हेक्टरी 105 ते 115 क्विंटल निघते तर उन्हाळी हंगामात 75 ते 65 क्विंटल निघते.
भेंडी लागवड click for video ; https://youtu.be/ks51dmrmcMc?si=HpxMlCrXONGucslk
भोपळा लागवड माहिती ; https://amchisheti.com/%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-bottle-gourd-vegetables/#more-510