दालचीनी हे 1 successful मसाले पीक

दालचीनी ची लागवड श्रीलंका मध्ये जास्त केली जाते .

दालचिनी हे उष्ण कटिबंधातील झाड आहे.

दालचीनी

दालचिनी हे भारतातील एक महत्त्वाची मसाला पीक आहे. दालचिनीच्या झाडाची साल दालचिनी म्हणून मसाल्यात वापरली जाते तर या झाडाच्या पानाचा उपयोग देखील तमालपत्र म्हणून मसाल्यात करतात. दालचिनीच्या सालातील व पानातील अर्क काढून त्याचा मसाल्यासाठी तसेच औषधे अत्तर व्हॅनिला इत्यादींच्या उत्पादनात उपयोग केला जातो.

दालचिनीची साल सहजरित्या सुटते अशी खात्री झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी साल काढताना खोडाचा 20 सेंटिमीटर भाग ठेवून करवदिशा किंवा कुळ त्याच्या साह्याने झाड कापावे व त्याच्या फांद्याचे आवश्यकतेनुसार दोन ते अडीच फुटाचे तुकडे करावेत. सदर फांद्यांच्या तुकड्यावरील खडबडीत साल हलक्या हाताने चाकूच्या साह्याने खरवडून काढावे.

फांद्या तोडल्यापासून शक्यतो ताबडतोब साल काढावे. झाड तोडल्यानंतर शिल्लक असलेल्या बुंध्यावर असंख्य फुटवे फुटतात त्यापैकी पाच ते सहा चांगले वाढले फुटवे ठेवून बाकीचे काढून टाकावेत. हे फुटवे साधारण दोन वर्षाचे झाले की पुन्हा काढण्या योग्य होतात. झाडावरील अंगठ्या इतक्या जाड व भुरकट रंगाच्या जुनं झालेल्या फांद्या धारदार कोयत्याने किंवा करवतीने तोडाव्यात त्यावेळी खोडाचा थोडा भाग शिल्लक ठेवावा.

दालचीनी लागवड साठी हवामान व जमीन :
दालचिनी हे उष्ण कटिबंधातील झाड आहे. उष्ण व दमट हवामान या झाडास चांगले मानवते. या हवामानामुळे झाडाची वाढ व सालीची प्रत चांगली राहते. या झाडास दिवसाचे सरासरी तापमान 27 डिग्री अंश सेल्सिअस असणे आवश्यक असते. दहा डिग्री अंश सेल्सिअस खाली तर 35 डिग्री अंश सेल्सिअस व तापमान हे या पिकास हानिकारक ठरते.

2000 ते 2500 मिमी पाऊस व त्याची व्यवस्थित विभागणी महत्त्वाची आहे. या झाडाला सुद्धा देखील विरळ सावलीची आवश्यकता असते त्यामुळे नारळ सुपारीच्या बागेतही हे पीक घेऊ शकतात. परंतु अति सावलीमुळे दालचिनीची प्रत बिघडते आणि झाड देखील कीड रोगास बळी पडते.

मध्यम प्रतीच्या हवामानात या पिकाची लागवड स्वतंत्रपणे उघड्या जमिनीवर देखील करता येते. इतर मसाला पिकांपेक्षा हे पीक कणखर असल्यामुळे बहुतेक सर्व जमिनीत चांगले येऊ शकते परंतु गाळाची अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन अधिक मानवते. थोडक्यात ज्या हवामानात नारळ सुपारी यासारख्या फुल झाडांची लागवड होते त्या हवामानात ही झाडे अगदी सहजरित्या येऊ शकतात.

दालचिनी लागवडीसाठी अभिवृद्धी :
दालचिनीची लागवड बियांपासून रोप करून तसेच निवडक झाडांच्या गुड्डी कलम तयार करून करता येते. गुटी कलम करण्यासाठी पेन्सिलच्या जाडीची मागील हंगामातील किंवा चालू हंगामाची फांदी वापरावी.

निवडलेल्या फांदीवर चाकूने काप घेऊन एक सेंटीमीटर जाडी इतकी रुंद साल काढावी आणि त्यावर शेवाळ किंवा लाकडाचा भुसा करण्यात भिजवून साल काढलेल्या जागी लावावे आणि पॉलिथिनच्या कापडाने बांधावे. पावसाळ्याच्या दीड ते दोन महिन्यात मुळ्या फुटून गुड्डी कलम तयार होते. इतर हंगामात तीन ते साडेतीन महिने लागतात.

दालचीनी लागवड पूर्व मशागत :
नारळाच्या बागेत लागवड करायची असल्यास नारळाच्या दोन्ही बाजूस दोन दोन मीटर अंतर सोडून खड्डे खोदावे. दालचिनीची सलग लागवड करावयास असल्यास दोन ओळीत आणि दोन ओळीतील झाडात सव्वा मीटर अंतर ठेवून 60 सेंटिमीटर लांबी ,रुंदी व खोलीचे खड्डे खोदावे.


खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून द्यावे.

दालचीनी लागवड हंगाम :
जून , जुलै महिन्यात तयार केलेल्या खड्ड्यांच्या मध्यभागी दालचिनीची रोपे किंवा कलम लावावे. लागवड केल्यानंतर पावसाचे पाणी बुंध्यात साठवून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

दालचिनीच्या सुधारित जाती :
कोकण कृषी विद्यापीठाने सन 1992 मध्ये कोकण तेज ही एक जात शोधून प्रसारित केली आहे. ही जात पानातील तसेच सालातील तेल काढण्यासाठी चांगली आहे. या जातीच्या दालचिनी मध्ये तेलाचे प्रमाण 3.2%
, सीना मोल्डो हाइड 70.23% आणि युजेनॉल 6.93% आहे .

दालचीनी आंतरमशागत व निगा :
रूपास व कलमास काडीचा आधार द्यावा. पहिली एक-दोन वर्ष झाडा सावली करणे गरजेचे आहे. वर्षातून दोन वेळा तरी झाडांच्या बुंध्यातील तण काढून बुंदी साफ ठेवावेत.

ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झाडांच्या बुंध्याभोवती माती खाणून सैल करावी. हंगाम व जमिनीच्या प्रकारानुसार पानाच्या पाळ्या द्याव्यात. मात्र रेतार जमिनीत उन्हाळ्यात दिवसाआड पाणी द्यावे.

दालचीनी लागवड खत व्यवस्थापन :
दालचिनीच्या झाडास पहिल्या वर्षी पाच किलो शेणखत किंवा कंपोस्ट किंवा वीस ग्रॅम नत्र किंवा १८ ग्राम स्फुरद आणि 25 ग्रॅम पलाश हे द्यावे. ही खतांची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी व दहा वर्षानंतर वीस किलो शेणखत किंवा कंपोस्ट आणि 200 ग्रॅम नत्र आणि 180 ग्रॅम स्फुरद व 250 ग्रॅम प्लस ही खते द्यावीत.

सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.युरिया ,डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा.

काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.

दालचीनी पीक संरक्षण :
लिफ्ट मायनॉर या किडीपासून दालचिनीस उपद्रव होतो. त्यासाठी दहा लिटर पाण्यात दहा मिली रोगार मिसळून फवारणी केल्याने किडींवर नियंत्रण घालता येते. तसेच या झाडांवर टक्का नावाच्या बुरशीजन्य रोगाचा हे प्रादुर्भाव होतो. एक टक्का बोर्डा मिश्रणाची फवारणी करून या रोगांवर नियंत्रण घालता येते.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दालचीनी काढणी व उत्पन्न :
दालचिनीचे झाड लावल्यानंतर प्रथम तीन वर्षानंतर झाडास आधार द्यावा लागतो. फेब्रुवारी ते मे महिन्यात जमिनीपासून वीस सेंटीमीटर उंचीवर मुख्य खोड कापावे. झाडांच्या खोडावरील थोडी साल यावेळी काढता येते. झाड कापल्यामुळे खोडांवर असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे सव्वा ते दीड मीटर वाढल्यानंतर फक्त टोकांवर दोन तीन फांद्या फुटतात.
साधारणपणे जानेवारी ते मे महिन्यात किंवाही साल सुटते.


सुमारे दोन वर्षाचे झाल्यानंतर ज्यांची जाडी दोन सेंटीमीटर पेक्षा अधिक जड आहे तसेच धुमारे कापण्यापूर्वी चाकूच्या साह्याने साल खोडावरून सहज सुट्टी होत आहे याची खात्री करून घ्यावी व त्यानंतरच धुमारे कापावे व फांद्यावरील साल लगेच काढावे. कापलेल्या फांदीवरील पाने व कोवळ्या फांद्या काढून टाकल्यानंतर चाकूचा उपयोग करून हलक्या हाताने साल काढून टाकावे.

त्यानंतर धुमाराच्या दोन्ही बाजूंवर चाकूने दोन उभ्या चिरा माराव्यात आणि साल ओढून काढावे आणि ती उन्हात वाळवावी. चार ते पाच दिवसात साल काढण्याचे काम फेब्रुवारी महिन्यात करावेत. फांद्या कापल्यानंतर त्याच दिवशी साल काढावे. पाणी वळून त्याचा मसाल्यासाठी उपयोग करतात.

पानाचा उपयोग तेल मिळवण्यासाठी करतात. पानाचा एका झाडापासून सुमारे 150 ते 200 ग्रॅम दालचिनी मिळते आणि दोन ते दोन पॉईंट पाच किलो तमालपत्र मिळते.

दालचीनी कटिंग :
दोन पानासह अंदाजे दहा सेंटीमीटर लांबीचे अर्ध कडकं लाकूड कापले जाते आणि पीपीएम किंवा रुटींग हार्मोनिक्स बी मध्ये बुडवले जाते आणि नंतर सावलीच्या ठिकाणी किंवा पॉलिथिन पिशव्यांमध्ये वाढलेल्या वाळूच्या बेडमध्ये लावली जाते. वाळूने भरलेले किंवा वाळू आणि वायर धूळ यांचे मिश्रण 1:1 असावे.

दालचिनीच्या काढणीतील महत्त्वाचे टप्पे :
काढण्यासाठी दालचिनीचे झाड तोडावे लागते त्यामुळे काढणीचा हंगाम खूपच महत्त्वाचा ठरतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी दालचिनी काढण्याचा आहे परंतु हा हंगाम देखील जमीन वातावरण आणि जातीनुसार बदलतो. आपल्या भागातील वातावरण कसे आहे याची निश्चिती करून घेणे महत्त्वाचे ठरते.


आता दालचिनी काढणीस तयार झाली आहे हे ओळखणे देखील महत्त्वाचे आहे त्यासाठी तयार फांदीवरील सालीचा एक लहानसा तुकडा चाकूने काप घेऊन काढावा लागतो. जर हा सालीचा तुकडा एकदम संस्थेने निघाला तर साल काढण्यासाठी तयार आहे असे समजावे व खोड तोडावे. आणि जर साल सहजपणे निघाली नाही तर पंधरा दिवसांनी पुन्हा तपासावे व जोपर्यंत साल सहजपणे सुटत नसेल तोपर्यंत झाड तोडू नये.


साल काढताना ती सकाळीच काढावी व फांदी तोडताना जमिनीपासून 25 ते 30 सेंटीमीटर उंचीवर तोडावी व आजूबाजूला असलेल्या हिरव्या लहान फांद्या लगेच तोडून बाजूला कराव्यात आणि पाण सावलीत वाढवावी.
मुख्य खोडांचे 30 सेंटिमीटर आकाराचे तुकडे वेगळे करून साल लगेच काढण्यात घ्यावी.

त्यासाठी खोडाच्या दोन्ही बाजूस उभे खोल काप द्यावेत. चाकूची बोथट बाजू या कापामध्ये घुसवून साल हलवून घ्यावी. त्यानंतर ती काढावी. साल काढण्या अगोदर सालीवरून ब्रासा रोड किंवा चाकू ती धार फिरवून साल रगडावे त्यामुळे वरचा लाकडाचा भुसा  सलीवरून निघून जातो.


दालचीनी ची साल काढल्यानंतर ती सावलीमध्ये वाळवून घ्यावी. परंतु थेट सूर्यप्रकाशात वाळू नये परंतु साल काढलेली खोड मात्र उन्हात वाळवावे.
सायंकाळी वाढलेल्या खोडांवर साल पूर्ववत चिटकून घ्यावी. त्यासाठी ती दोरीने खोडावर बांधून ठेवावे हे साल बांधलेले खोड दुसऱ्या दिवशी सावलीत वाळवून घ्यावे आणि तिसऱ्या दिवशी साल खोडावरून सोडून सावलीत वाळविण्यास ठेवावे. साधारण पाचव्या ते सहाव्या दिवशी साल वाळते.


दालचीनी ची साल सावलीमध्ये सुकवलेल्या नंतर एकदाच दोन तास उन्हात सुखवावे आणि सुखवतांना ती मलमलच्या पिशवीत भरून उन्हात ठेवावे.


एका दालचिनीच्या झाडापासून पाचव्या ते सहाव्या वर्षी सरासरी 300 ग्रॅम वाळलेली साल व 250 ग्रॅम पाने मिळतात.
जेव्हा दालचिनीचे झाड तोडले जाते तेव्हा त्याला असंख्य धुमारे फुटतात हे धुमारे वाळू द्यावीत व त्यापैकी सरळ आणि सशक्त चार ते पाच धुमारी ठेवून बाकीच्यांची विरळणी करावी.

दालचीनी साल वाळवने :
दालचीनी ची साल सावलीत वाळवावी. दालचीनी ची साल काढलेल्या फांद्या उन्हात वाळून घ्याव्या ज्या फांद्यावरून साल काढलेले असते त्याच फांद्यानंतरची साल बांधण्यात वापरावी. पहिल्या दिवशी दालचीनी ची साल बांधणीसाठी फांद्या उपलब्ध होणार नाहीत म्हणून वाळलेल्या काड्या किंवा प्लास्टिकच्या पाईप घेऊन त्यावर साल बांधावी त्यामुळे साल मिटवून परत खराब होत नाही. न बांधता साल वाढवल्यास तिची गुंडाळी होते त्यामुळे आतील भाग वाढत नाही. त्या ठिकाणी बुरशी येते व मालाची प्रत खराब होते. दालचीनी ची साल चढवलेल्या गाड्या सावलीत उभ्या ठेवाव्यात आणि पाच ते सहा दिवसानंतर काठ्यांवरून साल काढून सावली ठेवावी. नंतर उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिटे वाळवून मग हवाबंद डब्यात बंद करून ठेवावी.

click for video ; https://youtu.be/Do81cPM5RRU?si=KbdLJzIvYqACxjVP

ड्रॅगन फळ लागवड ;https://amchisheti.com/dragon-fruit-lagwad/#more-583