जायफळ लागवड काळाची गरज .
जायफळ लागवड कोकण विभागात जास्त करतात .

जायफळ लागवड हे दहा ते वीस मीटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे. जायफळामध्ये पपई व कोकम याप्रमाणेच नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. जायफळ बागेमध्ये सुमारे 50 टक्के झाडे मादी तर 45 टक्के नर व पाच टक्के संयुक्त फुले असणारे झाडे निघतात. घराच्या झाडास गुच्छाने फुले लागतात तर मादी झाडास एक एकटी फुले लागतात.
जायफळाची फळे चिकूच्या आकाराची पण गुळगुळीत व पिवळसर रंगाची असतात. फळांच्या डर फळांच्या आतील अंगास गुलाबी रंगाची जाळी असते व या जाळी जायपत्री असे म्हणतात. फळांच्या टरफलांचा उपयोग लोणचं चटणी, मुरब्बा इत्यादीसाठी करतात. फळांच्या टरफळांचा उपयोग मिठाई स्वादिष्ट करण्यासाठी तसेच जायफळ व जायपत्री चा उपयोग मसाल्यात केला जातो. जायफळातील तेलाचा उपयोग औषध साबण, टूथपेस्ट, चॉकलेट इत्यादी उत्पादनात केला जातो.
जायफळ लागवड हे उत्तम आणि सुगंधित असे मसाला पीक आहे भारतामध्ये जायफळाची लागवड केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रात मध्ये केली जाते. महाराष्ट्रात जायफळाची सर्वाधिक जास्त लागवड कोकण विभागात केली जाते. जायफळाची फळे ही गोल पिवळसर आणि गुळगुळीत असतात तर जायफळ वापर हा गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जायपत्री चा वापर विथ मसाल्यामध्ये केला जातो आणि जायफळाला उग्र वास व तिखट चव असते.
जायफळामुळे दात निरोगी राहतात आणि जायफळ मधुमेहावर सुद्धा प्रभावी आहे. जायफळ हे अँटिबॅक्टरियल गुणधर्माने निपुण असल्यामुळे दातांच्या आरोग्यासाठी जायफळ खूप लाभदायी जायफळाचे सेवन केल्याने लहान मुलांच्या डोळ्यांचे विकार बरे होतात. लहान मुले सर्दी खोकल्याला लवकर बळी पडतात जर आपण त्यांना आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जायफळ दिले तर लहान मुलांपासून सर्दी खोकला लांब राहतो.
जायफळापासून मिळालेले तेल हे फिकट पिवळे किंवा रंगही नसते. कॅफेंची प्रमाण जायफळाच्या तेलामध्ये जास्त असते आणि सालींचा उपयोग मुरब्बा लोणचं चटणी, कॅन्डी बनवण्यासाठी केला जातो. जायफळ मधील तेल सुद्धा साबण औषध किंवा टूथपेस्ट बनवण्यासाठी वापरतात.
जायफळ लागवड हवामान व जमीन :
जायफळ हे उष्णकटिबंधातील पीक असून या पिकास दमट हवामान व 2500 ते 4000 मिनी पर्यंत पाऊस चांगलाच मानवतो. पावसाची व्यवस्थित विभागणी असेल अशा 1500 ते 3000 मिनी पर्यंत पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही हे पीक येते. अति थंड म्हणजे दहा सेल्सिअस डिग्री किंवा त्याखाली तसेच अतिउष्ण म्हणजेच 40 सेल्सिअस डिग्री पेक्षा अधिक तापमान या विकास मानवत नाही.
समुद्रसपाटीपासून 750 मीटर उंचीपर्यंत हे पीक घेतले जाते. किनारी पट्टीतील रेताळ गाळ मिश्रित येतात वर्क अशा विविध प्रकारच्या परंतु उत्तम मिश्राच्या जमिनीत जायफळाची लागवड होऊ शकते. कोट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन अधिक मानवते. या झाडाला देखील सावलीची आवश्यकता असल्यामुळे आंतरपीक म्हणून घेतले जाते. नारळ सुपारीच्या बागेत या झाडास आवश्यक असणारी सावली तसेच पश्चिमी वारे यापासून आवश्यक असणारी संरक्षण मिळते.
जायफळ लागवड सुधारित जाती :
जायफळामध्ये नर व मादी झाडे वेगवेगळे असतात त्यामुळे विविध आढळून येते. त्याप्रमाणे खालील काही
कोकण सुगंधा : जायफळाची ही जात डॉक्टर बाबासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे ही जायफळाची उभयलिंगे जात आहे म्हणजे सर आणि मादी फुले दोन्ही एका झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात त्यामुळे परागीभवन साठी वेगळे नर झाडे लावण्याची गरज पडत नाही या जातीपासून सुमारे 525 ते 550 फळे दरवर्षी मिळतात आणि बियांचे वजन 5.25 ग्रॅम पर्यंत मिळते.
कोकण स्वाद : जायफळाची ही जात देखील डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि हे जायफळाची मादी जात आहे याची वाढ सरळ होते आणि जायफळाच्या बियांचा आकार सुमारे पाच ग्रॅम पर्यंत असतो आणि जायपत्री सुमारे 1.3 ग्रॅम पर्यंत असते. या जातीची सरासरी 760 ते 780 फळे प्रतिवर्षी मिळतात.
कोकण श्रीमंती : ही जात डॉक्टर बाबासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने कोकण या विभागासाठी विकसित केलेले आहे या जातीची फळे टपोरी आणि आकारात मोठी असतात आणि या जातीपासून दरवर्षी सुमारे 900 ते 920 पर्यंत येतात. या जातीच्या जायफळाची बी आकाराने मोठे असून साधारणपणे दहा ग्रॅमचे असते आणि जायपत्री सुमारे दोन ग्रॅम पर्यंत मिळते.
कल्लीवलय : ही जात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बनवलेली आहे आणि या जायफळाची जातीमध्ये झाडापासून साधारणपणे 500 फळे मिळतात आणि जायफळांच्या बियांची वजन नऊ ग्राम पर्यंत मिळू शकते.
जायफळ लागवड पूर्व मशागत :
जायफळ लागवड 7.5 ते 7.5 मीटर अंतरावर असल्यास पावसाळ्यापूर्वी प्रत्येक दोन नारळाच्या मध्यभागी व सुपारीच्या बागेत चार सुपारीच्या झाडांच्या चौफुलीवर 90 सेंटीमीटर लांबी रुंदी व खोलीचे खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात पन्नास किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे.
जायफळ लागवड अभिवृद्धी :
जायफळाची अभिवृद्धी बी पासून तसेच कलमे करून सुद्धा करता येते परंतु प्रामुख्याने जायफळाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून केली जाते. बियांपासून तयार केलेले रोप हे नराचे किंवा मादीचे हे कळत नाही. रोप लावल्यानंतर त्याला जवळजवळ सहा ते सात वर्षानंतर फुले येऊ लागतात. त्यानंतर ते झाड घराचे आहे किंवा मादीचे ते कळते फक्त मादी झाडास फळे धरतात.
रोपे तयार करण्यासाठी जायफळाचे ताजे बी वापरावे लागते. बी रुजवण्यासाठी पंधरा सेंटीमीटर उंच एक ते एक पॉईंट पाच मीटर रुंद व आवश्यक त्या लांबीचे गादीवाफे तयार करून घ्यावे. गादीवाफे तयार करण्यासाठी माती व वाळू यांचे योग्य मिश्रण वापरावे. तयार केलेल्या गादीवाफ्यावर जायफळाची बी रुजण्यास सुरुवात होते सुमारे दहा ते पंधरा दिवसांनी रोपे प्लास्टिकच्या पिशव्या लावण्यास योग्य होतात. सुमारे एक वर्षाची रोपे लागवडी योग्य असतात.
जायफळाची अभिवृद्धी कलमे करून देखील करता येते.
भेट कलम मृदकास्ट कलम अशा कलमाच्या पद्धती वापरून आपल्याला जायफळाची अभिवृद्धी करता येते. जायफळाची कलमे लावल्यामुळे बरेच फायदे होऊ शकतात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी मादीची आणि नाराची झाडे लावता येतात. मादी झाडाची काडी वापरून बांधलेल्या कलमांपासून मादी झाड मिळते तर नर झाडाची काडी वापरून बांधलेल्या कलमांपासून नराचे झाड मिळते.
दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कलमांना फुले लवकर म्हणजे तिसऱ्या वर्षी लागतात त्यामुळे लवकर उत्पन्न मिळते. ज्या मादी झाडाच्या काड्या करणे बांधण्यासाठी वापरलेल्या असतात त्या झाडांसारखीच तयार केलेली कलमे उत्पादनाला असतात. थोडक्यात जायफळांची अभिवृद्धी कलमाने केल्यास आपणास पाहिजे त्या गुणधर्माचे झाड निर्माण करता येते.
जायफळाची कलमे लावून जरी आपण लागवड केली तरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागेतील नर आणि मादी झाडांचे प्रमाण दर दहा मादी झाडांच्या कलमा मागे कमीत कमी एक नराचे कलम असणे आवश्यक आहे. जर फक्त मादी झाडांचीच कलमे लावली तर फक्त फुले येतील पण नर झाड नसल्याने फळधारणा होणार नाही.
जायफळ लागवड :
जून महिन्यात तयार केलेल्या खड्ड्यांच्या मध्यभागी जोमाने वाढणारे रोग किंवा कलम लावून त्यांच्या भुताची माती पायाने दाबून घट्ट करावी. रोपांची लागवड करावयाची झाल्यास रोपे निरोगी सशक्त तसेच एक ते दोन वर्षे वयाची असावे. कलम लागवडीत कलमाच्या जोड व्यवस्थित असून कलम बांधलेली प्लास्टिक पट्टी अगर सुतळी सोडून टाकली आहे याची खात्री करावी तसेच कलमांच्या जोड जमिनीवर राहील याची दक्षता घ्यावी.
जायफळ लागवड खत व्यवस्थापन :
जायफळाच्या झाडास पहिल्या वर्षी दहा किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, वीस ग्रॅम नत्र, दहा ग्राम स्फुरद पन्नास ग्रॅम पालाश द्यावे. ही खतांची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावे. मात्र आठ ते दहा वर्षानंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 500 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्फुरद आणि एक किलो पलाश द्यावे.सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.
त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.युरिया ,डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .
माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
जायफळ लागवड आंतरमशागत व निगा :
जायफळ हे बागायती पीक आहे म्हणूनच जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमीन खडीत कोरडी होणार नाही आणि अति पाणी दिल्याने दल दल होणार नाही याची काळजी घ्यावी. अरे तर जमिनीत उन्हाळ्यात प्रत्येक दोन दिवसात पाणी द्यावे. गरज भासल्यास पावसाळ्यात बागेतील पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी पाणी द्यावे. आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वर्ष तरी जायफळ रोपांना किंवा कलमांना सावली करणे आवश्यक असते.

काढणी व उत्पादन :
जायफळाला फुले आल्यानंतर फळधारणा ते काढणीपर्यंत आठ ते दहा महिन्याचा कालावधी लागतो. जायफळाला वर्षभर फुले येत असतात. परंतु जुलै ते ऑगस्ट आणि फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत फळांची जास्त काढणी केली जाते. पूर्ण पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा होतो. तसेच टरफलास देठाच्या विरुद्ध बाजूस तडा जातो. अशी फळे काढावी किंवा पडल्यानंतर गोळा करावीत की टरफले वेगळी करून जायपत्री अलगद काढावी.
जायपत्री व बिया उन्हात वाळवाव्यात परंतु बरीचशी जायफळे पावसाळ्यात तयार होत असल्याने उन्हात वाळविता येत नाही अशावेळी बिया व जायपत्री मंद उष्णतेवर वाढवाव्यात. जायपत्री सहा ते आठ दिवसात तर जायफळे पंधरा दिवसात वाळतात.
पूर्ण वाढीच्या मादी झाडांपासून 500 ते 800 फळे मिळतात. 25 वर्षापर्यंत उत्पन्न वाढत जाते आणि पंचवीस वर्षाच्या झाडापासून दोन ते तीन हजार फळे मिळतात. 60 ते 70 वर्ष या झाडांपासून किफायतशीर उत्पन्न मिळते.
रोग व कीड :
या झाडास रोग व किडीपासून फारसा उपद्रव होत नाही. क्वचित फळ कुजणे हा रोग आढळून येतो अशावेळी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करून या रोगांवर नियंत्रण घालता येते.
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
click here for video : https://youtu.be/0-7qva6CwLY?si=FSyaCmJfYb_7BqUG
एरंडी लागवड ; https://amchisheti.com/erandi-sheti-castor-crop-in-marathi/